Friday, March 13, 2026 10:14:19 PM

Sunetra Pawar: 'डोळ्यांत अश्रू, मनात दुःखाचा डोंगर, तरीही...' सुनेत्रा पवारांचा भावुक VIDEO व्हायरल

अदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले असून राज्यभरातून त्यांना सहानुभूती आणि पाठिंबा मिळत आहे.

sunetra pawar डोळ्यांत अश्रू मनात दुःखाचा डोंगर तरीही सुनेत्रा पवारांचा भावुक video व्हायरल

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एक भावुक व्हिडिओ आज समोर आला असून, तो सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये त्या अतिशय भावनिक झालेल्या दिसतात. पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्या अत्यंत भावुक झाल्याचे व्हिडिओत दिसते. 

हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत “दुःखाचा सह्याद्री अन् कर्तव्याचा हिमालय!!” असे भावनिक शब्दांत लिहिले. त्यांच्या या पोस्टनंतर राज्यभरातून सुनेत्रा पवार यांच्याप्रती सहानुभूती आणि पाठिंब्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

अदिती तटकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी, आपल्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे असह्य दुःखाची जाणीव करून देणारे आहेत. पण अशा कठीण प्रसंगातही आपण ज्या धैर्याने दादांच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या, ते आम्हा सर्वांना स्तब्ध करणारे आहे.” त्यांनी पुढे लिहिले की, “या संघर्षमय प्रवासात माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आणि संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जलद निर्णय घेत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र एवढ्या लवकर शपथविधी झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

आता समोर आलेल्या या भावनिक व्हिडिओमुळे सुनेत्रा पवार यांच्या मनातील वेदना आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून येत आहे. दुःखाच्या या काळातही त्यांनी धैर्याने नेतृत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्या भूमिकेचे राज्यभर कौतुक होत आहे. राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.


सम्बन्धित सामग्री