राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. 26 फेब्रुवरीला मुंबईतील वरळी डोंब या सभागृहात होणार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आज संध्याकाळी 5 वाजता होणार राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. याच राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटी सदस्य, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार, खासदार हे देखील उपस्थित होते. दरम्यान सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांची पक्षातील सर्व नेत्यांकडून एकमताने निवड झाली असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजित पवारांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखात वगळता इतर खाती आणि तसेच विधीमंडळ गटनेता पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी तत्काळ हाती घेतली होती. मात्र आता अजित पवारांकडे असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवारच घेणार आहेत. अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील कार्यकर्त्याना त्यांच्या भाषणात काय संदेश देतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.