Maharashtra Weather Update: मार्च महिन्याची सुरुवात होताच राज्यात उन्हाचा जोर वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी हलकासा गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र कडक ऊन नागरिकांना हैराण करत आहे. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा ३ ते ४ अंश सेल्सियसने वाढू शकतो.
विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक फटका
सध्या सर्वाधिक तापमान विदर्भात नोंदवले जात आहे. अमरावती आणि वर्धा येथे तापमानाने 37 अंशांचा टप्पा गाठला आहे. नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांतही पुढील काही दिवसांत कमाल तापमान 34 ते 37 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा:Ulwe Coastal Road: 21.8 किमीचा अटल सेतू आणि 6.7 किमीचा उलवे कोस्टल रोड; दक्षिण मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवासाचे अंतर आता अवघ्या 40 मिनिटांवर
कोकणात दमट उकाडा
दरम्यान, मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णतेसोबत आर्द्रतेचा त्रास जाणवत आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हवेत वाढलेली आर्द्रता अस्वस्थता वाढवत आहे. मुंबईत कमाल तापमान 29 ते 32 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास असेल. समुद्रकिनारी भागात दमट वाऱ्यांमुळे उकाडा अधिक जाणवतो आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा कोरडा
पुणे, सतारा आणि कोल्हापूर या भागांत सध्या कोरडे आणि उष्ण हवामान आहे. पुण्यात कमाल तापमान 31 ते 34 अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. नाशिक परिसरात सकाळी काही प्रमाणात गारवा असला तरी दुपारी उन्हाची तीव्रता वाढते आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि लातूर भागात तापमान 33 ते 36 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.हेही वाचा:Ahilyanagar Crime News: ‘तू आमच्या बहिणीच्या गावात...’ फोन करून बोलावलं आणि तरुणावर जीवघेणा हल्ला; कोपरगावात खळबळ
हेही वाचा:Ahilyanagar Crime News: ‘तू आमच्या बहिणीच्या गावात...’ फोन करून बोलावलं आणि तरुणावर जीवघेणा हल्ला; कोपरगावात खळबळ
वाढत्या तापमानामुळे उष्माघात आणि निर्जलीकरणाचा धोका वाढतो. तज्ज्ञांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी, लिंबूपाणी किंवा ताक यांसारखी पेये पिणे, हलके आणि सुती कपडे परिधान करणे तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.