Saturday, June 14, 2025 03:33:37 AM

मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी

मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी

मुंबई: मनपा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने तयारी सुरु केली आहे. उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 

ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आलं. यामध्ये 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी करण्यात येतं आहे. 
हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याचे पाटलांचे सूतोवाच; शशिकांत शिंदे, राजेश टोपेंच्या नावाची चर्चा

ठाकरेंचे शिलेदार, निवडणुकांची जबाबदारी 

1. अमोल कीर्तीकर - दहिसर, बोरिवली, मागाठाणे 
2. उद्धव कदम - चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
3. विलास पोतनीस - दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व 
4. विश्वासराव नेरूरकर - वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम 
5. रवींद्र मिर्लेकर - विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम 
6. गुरुनाथ खोत - चांदिवली, कलीना, कुर्ला 
7. नितीन नांदगावकर - विक्रोळी, भांडुप, मुलुंड 
8. सुबोध आचार्य - घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द 
9. मनोज जमसूतकर -अणुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा 
10. अरुण दूधवडकर - धारावी, माहीम, वडाळा 
11. अशोक धात्रक - वरळी, दादर, शिवडी 
12. सचिन अहिर - मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी


सम्बन्धित सामग्री