Tuesday, February 17, 2026 09:03:37 AM

Nagpur Election Results 2026 : नागपुरात भाजपने गड राखला, मात्र 8 जागांच नुकसान

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा निकाल आज स्पष्ट झाला असून नागपुरात भाजपने गड राखला मात्र, गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपला आठ जागांचे नुकसान झाले आहे.

nagpur election results 2026  नागपुरात भाजपने गड राखला मात्र 8 जागांच नुकसान

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा निकाल आज स्पष्ट झाला असून राज्याच्या राजकारणात भाजपने अभूतपूर्व 'महाविजय' संपादन केला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपला दबदबा कायम ठेवला असून काही ठिकाणी भाजपला देखील मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला म्हणजेच नागपूर महानगरपालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएमसह स्थानिक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी नागपुरात 151 जागांसाठी 51 % टक्के मतदान झालं असून 24 लाख मतदारांनी 993 उमेदवारांसाठी कौल दिला आहे. 

हेही वाचा- Neela Desai Passes Away : ठाकरेंना दुहेरी झटका! आधी मुंबई हातातून गेली, निकालानंतर काही क्षणातचं पहिल्या महिला आमदाराचं निधन
16 जानेवारी 2026 ला जाहीर झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानुसार, नागपुरात भाजपने गड राखला मात्र, गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपला आठ जागांचे नुकसान पत्कारावे लागले. 2017 मध्ये भाजपच्या 108 जागा आल्या होत्या, त्यानुसार यंदा 100 जागांवर भाजपला आपला गुलाल उधळता आला. युती मिळून भाजपला 102 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर काँग्रेसने 2017 च्या तुलनेत सहा जागांनी पुढे जात 29 जागांवर असलेल्या काँग्रेसने 35 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच नागपुरात मुस्लिम बहुल भागात मतदारांनी काँग्रेसला नाकारले असून एमआयएमच्या पहिल्यांदाच सहा जागा तर मुस्लिम लीगच्या चार जागा आल्या आहेत. त्याचसोबत बसपाच्या हत्तीला नागपूरकरांचा थांबा तर उबाठाचे दोन नगरसेवक कायम आहेत. 

हेही वाचा- Malegaon Election Result 2026 : मालेगाव महापालिकेच्या निकालामुळे राजकारणात मोठी उलथापालथ; भाजपाचा दारुण पराभव, विजयी उमेदवार जाहीर
दरम्यान 2017 साली झालेल्या म्हणजेच जवळपास 8 वर्षांपूर्वी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक 108 जागांवर विजयी बहुमत प्राप्त करत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तसेच दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 29 जागा जिंकता आल्या. तर बहुजन समाज पक्षाला तिसऱ्या स्थानी 10 जागा मिळाल्या होत्या.
 


सम्बन्धित सामग्री