शर्यत गाजवणाऱ्या बैलाचे मालकाने फेडले अनोखे ऋण

शर्यत गाजवणाऱ्या बैलाचे मालकाने फेडले अनोखे ऋण

राज्यात शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली असली तरी, मालक आणि चालकांनी त्यांच्या बैलावरील प्रेम काही कमी केलं नाही. शर्यतीचे अनेक घाट गाजवणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यातील धामणे गावात अशाच एका बैलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर मालकाने जे केलं, ते पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला.

नेमकं प्रकरण काय ?

कबिर्या सहा महिन्याचा असताना मावळातील गराडे कुटुंबीयांचा सदस्य झाला. पोटच्या मुलाप्रमाणे कबिर्याला गराडे कुटुंबीयांनी जपलं. वेळच्यावेळी खुराक, आरोग्याची निगा इतकंच नव्हे तर प्रत्येक सणाला त्याला नटवलं जायचं.

शर्यतीसाठी त्याचं योग्य ते प्रशिक्षण घेत त्याला खिलार बनवलं. म्हणूनच अनेक वर्ष तो शर्यतीच्या घाटाचा राजा राहिला. पाच वर्षांपूर्वी शर्यतीवर बंदी आली, याच शर्यतीवरील बंदी हटण्याची प्रतीक्षा सुरु असताना. वयाच्या अठराव्या वर्षी कबिर्याने अखेरचा श्वास घेतला. 

कुटुंबातील सदस्य गेल्याची सदभावना बाळगत, गराडे कुटुंबीयांनी कबिर्याची समाधी उभारली. दशक्रिया विधीवत पूजा ही केली, कुटुंबीयांनी मुंडन ही केलं. पिंडदान करताना कावळा येत नसल्याने महिला सदस्य आणि बैलावर अफाट प्रेम करणारे बच्चे कंपनी यांनी हात जोडून माफी ही मागितली.

घाट गाजवणारा कबिर्या राज्यभर प्रचलित असल्याने, पुणे जिल्ह्यातील गाडा मालक-चालकांनी ही दशक्रियेला हजेरी लावली होती. मुक्या प्राण्यांवर लावलेलं हे जीव पाहून, कबिरयाच्या कुटुंबीयांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तर बैलगाडी शर्यत बंदीनंतरही गाडी मालक-चालक बैलांवर किती प्रेम करत आहेत हे ही यातून समोर आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version