Thursday, July 17, 2025 03:22:28 AM

तुझ्या बापाला पेरणीसाठी 6 हजार लोणीकरनं दिले; लोणीकरांची जीभ घसरली

मोदी फडणवीसांना अंध:भक्त म्हणणाऱ्यांवर आमदार बबनराव लोणीकरांनी टीका केली आहे. टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे.

तुझ्या बापाला पेरणीसाठी 6 हजार लोणीकरनं दिले लोणीकरांची जीभ घसरली

जालना: मोदी फडणवीसांना अंध:भक्त म्हणणाऱ्यांवर आमदार बबनराव लोणीकरांनी टीका केली आहे. टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे. तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणीकरनं दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे.  

नरेंद्र मोदीजींचे अंध:भक्त म्हणणारे कुचरवट्यावर बसणारे कार्टे आहेत असं वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. कुचरवट्यावर बरणाऱ्या कार्टाच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो, तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये बबनराव लोणीकराने दिले, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे असे लोणीकरांनी लाभार्थ्यांविषयी म्हटले आहे. 

हेही वाचा : Maharashtra Rain Update: कोणत्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली?

'आमचेच घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो' 
नरेंद्र मोदीजींचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अंध:भक्त म्हणणारे कुचरवट्यावर बसणारे कार्टे आहेत असं वक्तव्य जालना जिल्ह्यातील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय. परतूर तालुक्यातील वाटूर येथे हर घर सोलार योजनेचं लोणीकरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. काही तरुण कुचरवट्यावर बसतात आणि हे आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत असं लिहितात. गावात विकासाची कामं केली, विविध योजनेतून पगार सुरु केले, पेन्शन योजना आणली. मात्र कुचरवट्यावर बसणारे कार्टे लिहितात की हे देवेंद्र फडणवीसांचे, नरेंद्र मोदीजींचे अंध: भक्त आहेत. पण तुझ्या गावात पंचवीस वर्षात जे दिलं ते बबनराव लोणीकरांनीच दिलं. कुचरवट्यावर बरणाऱ्या कार्टाच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो, तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये बबनराव लोणीकराने दिले, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे असं लोणीकर यांनी म्हंटलं आहे.

 


सम्बन्धित सामग्री