अग्निपथ योजनेतील अग्निविरांची पहिली तुकडी सेवेत रुजू

मुंबई, ८ जुलै २०२३,प्रतिनिधी: अग्निपथ या योजनेला २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती सुरुवातीला ह्या योजने संदर्भात अनेक समज गैरसमज होते. पण कालांतराने या योजनेला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. अग्निपथ योजने अंतर्गत तरुणांना ४ वर्षासाठी सेनेत भरती करून घेतले जाणार आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण चार वर्षांनंतर […]

अग्निपथ योजनेतील अग्निविरांची पहिली तुकडी सेवेत रुजू

मुंबई, ८ जुलै २०२३,प्रतिनिधी: अग्निपथ या योजनेला २०२२ मध्ये मान्यता मिळाली होती सुरुवातीला ह्या योजने संदर्भात अनेक समज गैरसमज होते. पण कालांतराने या योजनेला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. अग्निपथ योजने अंतर्गत तरुणांना ४ वर्षासाठी सेनेत भरती करून घेतले जाणार आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण चार वर्षांनंतर या तरुणांनी करायचं काय? किंवा या तरुणांना चार वर्षांनंतर सरकार रोजगार उपलब्ध करून देणार का? असे अनेक प्रश्न तरूणानाच्या मनात होते.

अग्निपथ या योजने अंतर्गत तरुणांना ३० हजार वेतन देखील दिले जाते. अग्निपथ या योजने अंतर्गत भरती होण्यासाठी वयोमर्यादा आहे, तसेच जिथे सैनिकांना भरती होण्यासाठी ९ महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागायचे त्या ठिकाणी आता फक्त ६ महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते.

तसेच प्रशिक्षणानंतर या सैनिकांना अग्नीवर असे म्हंटले जाते. भरती झालेल्या सैनिकांना आता अग्नीवर असे संबोधले जाणार आहे. तसेच ही एक नवीन लष्करी श्रेणी असेल असंही सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला या योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या परंतु आता या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच सूत्रांचा माहिती नुसार अग्निविरांची पहिली तुकडी सेवेत रुजूही झाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number