Saturday, February 14, 2026 03:12:44 AM

Sunetra Pawar : दादांच्या निधनानंतर आईला सावरलं, जय-पार्थ भावंडांचा खंबीर पाठिंबा; 'त्या' एका निर्णयामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं

सुनेत्रा पवारांकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या या होकारामागे त्यांची मुलं जय पवार आणि पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे.

sunetra pawar  दादांच्या निधनानंतर आईला सावरलं जय-पार्थ भावंडांचा खंबीर पाठिंबा त्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे पक्षांची धुरा कोण सांभाळणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार, या सर्व विषयांवर चर्चा रंगू लागल्या असताना महाराष्ट्राच्या राजकारणत नवं पर्व सुरु झालं आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली जात असताना आता मोठी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- Sunetra Pawar Breaking: सुनेत्रा पवार होणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शपथविधीची वेळही ठरली
मुंबईत उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग मोकळा झाला असून, सुनेत्रा पवार यांच्याकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटले यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्या असून सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत. यादरम्यान एक मोठा बातमी समोर आली आहे शनिवारी संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभणार आहेत. 

हेही वाचा- Ajit Pawar Death: शरद पवार अन् सुप्रिया सुळे भावूक; अजितदादांच्या आई आशाताईंची भेट घेऊन केलं सांत्वन
मात्र त्यांच्या या होकारामागे त्यांची मुलं जय पवार आणि पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे. अजित पवारांच्या अस्थी बारामतीच्या नीरा नदीत विसर्जित करून आल्यानंतर, बारामतीच्या सहयोग सोसायटी अजित पवरांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार, मुलगा जय पवार, पार्थ पवार आणि नरेश अरोरा यांच्यात एक बैठक पार पडली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारण्यास होकार दिला. त्यांच्या या होकाराचा निरोप नरेश अरोरा यांनी मुंबईकडे दिला. त्यानंतर आता सुनेत्रा पवार या उद्या म्हणजेच शनिवारी 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडतील.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या