Wednesday, April 22, 2026 11:28:43 PM

Ashok Kharat News : मोठी बातमी! भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार; गेल्या 13 दिवसांपासून...

अशोक खरात विरोधात गेल्या 13 दिवसांपासून SIT कडून चौकशी सुरू असून आतापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झाले आहेत. भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे.

ashok kharat news  मोठी बातमी भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार गेल्या 13 दिवसांपासून

धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून आरोपी कॅप्टन अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यादरम्यान त्याच्याविरोधात गेल्या 13 दिवसांपासून SIT कडून चौकशी सुरू असून आतापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झाले आहेत. भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे. अशोक खरातला आज नाशिक न्यायालयात हजर करणार आहे. अशोक खरातला आज कोर्टात दाखल केल्यानंतर एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर करत पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

हेही वाचा- Ashok Kharat Case : खरातची पत्नी फरार, मुलगा एसआयटीच्या ताब्यात, एक तास झाली चौकशी; बापाबद्दल नेमकं काय म्हणाला?
आयकर विभागाकडून खरातवर कारवाई होणार
तसेच एसआयटी चौकशीतून खरात विषयी आणखी माहिती समोर आली आहे. यात भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर वापरत असल्याची माहिती मिळाली. तसेच 1 नंबर फक्त vip लोकांसाठी वापरत असून दुसऱ्या नंबर हा विशेष काही भक्तांसाठी व महिलांसाठी वापरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर तिसऱ्या नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती आहे. फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डाटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. त्याचसोबत अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असून भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता. आयकर विभागाला अशोक खरातने जीएसटी बुडवल्याचा देखील संशय आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून देखील अशोक खरातवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Amitabh Gupta: वैष्णवी हगवणे प्रकरण आणि शस्त्रपरवान्यांचा वाद; चौकशीअंती IPS अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष
खरातची पत्नी कल्पना खरात फरार 
शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात शिर्डी पोलिसांत अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अशोक खरातच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होण्याआधीच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिस आणि SIT च्या पथकातील महिला अधिकारी आणि एक पुरुष पोलिस अधिकारी खरात याच्या तृप्तबाला या बंगल्यात दाखल झाले होते. कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक नाशिकच्या अशोक खरातच्या घरी गेले असता कल्पना खरात घरात नव्हती. कल्पना खरात फरार झाल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हर्षवर्धनची SIT पथकाकडून तब्बल एक तास चौकशी करण्यात आली. अशातच कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे. कल्पना खरातच्या अटकेसाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 


सम्बन्धित सामग्री