Crime News : दोन गटात वाद! भरचौकात गोळीबाराचा थरार; 72 तासात गंभीर गुन्ह्यांच्या सलग तीन मोठ्या घटना

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 72 तासांत सलग तिसऱ्या दिवशी गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळाले.

Crime News : दोन गटात वाद! भरचौकात गोळीबाराचा थरार; 72 तासात गंभीर गुन्ह्यांच्या सलग तीन मोठ्या घटना

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर येत आहे. गेल्या 72 तासांत सलग तिसऱ्या दिवशी शहरात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच असून काल, गुरुवारी  पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने शहर हादरलं. 16 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या हनुमान चौकात दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका तरुणाने भररस्त्यात बंदूक काढत हवेत दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने या गोळीबारात जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा : Noida Violence: नोएडा हिंसाचारामागे पाकिस्तानचे ‘सोशल’ षड्यंत्र; कामगार आंदोलनात दंगल घडवण्यासाठी वापरला हा मार्ग, पोलिसांचा मोठा खुलासा

गेल्या तीन दिवसांचा आढावा 

* पहिली घटना एपीआय कॉर्नर येथे जीवघेणा चाकू हल्ला
* दुसरी घटना बीड बायपासवर वकिलाचा निर्घृण खून 
* तिसरी घटना हनुमान चौकात गोळीबार

एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का?, की संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढत चाललायं?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number