मुंबई प्रवास हा कित्येक वर्षापासून जीवघेणा बनला आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. सोहमचं बारावीचं परीक्षा केंद्र कळव्यातील मनीषा विद्यालयामध्ये होतं. त्यासाठी तो डोंबिवली होऊन निघाला होता. मात्र मुंब्रा आणि कळव्यादरम्यान ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती की, सोहमचा तोल गेला आणि धावत्या लोकलमधून तो खाली पडला. ज्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला आणि यात त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा- Sushma Andhare : 'बाटलीमध्ये सिरींज घुसवणारी ती कृती...', सुषमा अंधारे यांनी रोहित पवार यांच्या त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष
यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मुंब्रा आणि कळवा यात जे झालं ते कळवा पंतप्रधानांना आणि म्हणजे खर रेल्वे काय आमचा प्रश्न नाहीये... रेल्वे खासदारांचा आणि पंतप्रधान आपल्या देशाचे अगदी सक्षम आहेत... त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जे रेल्वेचे मंत्री महोदय ते फक्त मुंबईत काय येतात आणि बघतात काय?" असा प्रश्न उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.