‘8 दिवसांपूर्वीचं ते बोलणं शेवटचं…’ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावूक

तुकाराम मुंढे आणि नाना पाटेकर यांच्यातील मैत्री आणि स्नेहपूर्ण भावना दर्शवणारी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe on Nana Patekar Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. नानांच्या या अकस्मात एक्झिटमुळे सिनेसृष्टीसह, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आणि आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अत्यंत भावूक झाले. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत नानांना श्रद्धांजली वाहिली आहे. “मी आज केवळ एक महान कलाकारच नाही, तर एका विलक्षण माणसाला आणि माझ्या जिवाभावाच्या जिवलग मित्राला गमावले आहे. नाना हे अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक होते ज्यांच्या आपुलकीचा आणि स्नेहाचा स्पर्श त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला भावायचा,” अशा शब्दांत मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा – गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले, डॉक्टरांचे अथक प्रयत्न, पहाटे 5:20 वाजता…; त्या 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?

‘लव्ह यू बाळा’ ठरले शेवटचे शब्द; शेवटच्या संभाषणाची आठवण

आपल्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांनी नानांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाचा उलगडा केला. अवघ्या 8 दिवसांपूर्वीच दोघांमध्ये सविस्तर बोलणे झाले होते. “ती चर्चा आमची शेवटची ठरेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. फोन ठेवताना ते मला शेवटी ‘लव्ह यू बाळा’ असे म्हणाले होते,” ही आठवण सांगताना मुंढे गहिवरले. काही माणसे आयुष्यात स्वतःचाच एक अंश मागे ठेवून जातात आणि नाना पाटेकर हे अगदी तसेच व्यक्तिमत्त्व होते, असेही त्यांनी नमूद केले.


सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या पोस्टची मोठी चर्चा

तुकाराम मुंढे आणि नाना पाटेकर यांच्यातील मैत्री आणि स्नेहपूर्ण भावना दर्शवणारी ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नामांकित सनदी अधिकारी आणि स्पष्टवक्ते अभिनेते यांच्यातील बंध या पोस्टमधून समोर आल्याने अनेकजण त्यावर भावूक प्रतिक्रिया देत आहेत. सिनेसृष्टीसह सामाजिक कामातही मोठे योगदान देणाऱ्या या महान कलाकाराच्या जाण्याने एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा – ‘शेतातच माझं शेवटचं कार्य व्हावं’ नाना पाटेकरांची अंतिम इच्छा; पार्थिव ‘या’ गावी नेणार, अंत्यसंस्काराची मोठी अपडेट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version