छातीत वेदना, रात्री 2.30 वाजता मित्राला मेसेज अन् नानांना दरदरून घाम फुटला; शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं?

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

छातीत वेदना, रात्री 2.30 वाजता मित्राला मेसेज अन् नानांना दरदरून घाम फुटला; शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं?
Nana Patekar

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकरांच्या निधनापूर्वी त्यांना छातीत वेदना होत असल्याचे त्यांच्या एका मित्राला प्रकृती ठीक नसल्याचा मेसेज करत सांगितले होते, ही माहिती मणिपाल हॉस्पिटलचे डॉ. शेखर सालकर यांनी दिली आहे.

ही मेसेज रात्री 2.30 वाजताच्या सुमारास पाठवण्यात आला होता. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मित्राला हा मेसेज पाहिला नव्हता. त्याने नंतर नाना पाटेकर यांना फोन केला आणि पहाटे सुमारे 4 वाजता त्यांच्या घरी पोहोचला होता. हा मित्र घरी पोहचल्यानंतर नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना घाम देखील फुटला होता. त्यानंतर त्यांच्या मित्राने नाना पाटेकर यांच्या केअरटेकरला रुग्णालयात पाठवलं आणि तातडीने रुग्णालयाची इमर्जन्सी टीम घटनास्थळी पोहोचली.

हेही वाचा- “राजकारण सोडून द्या पण, ते माझ्या…” दादांच्या आठवणींनी नाना गहिवरले होते; जिवलग मित्रांची मैत्री निधनानंतरही चर्चेत

नाना पाटेकर यांची खालावलेली प्रकृती पाहून त्यांना घटनास्थळीच ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला. त्यानंतर त्यांना तत्काळ मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न केले, त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. या प्रकरणी ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आली असून शवविच्छेदन केले जाईल,” अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेला दिली.

दरम्यान मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित करण्यासाठी पोस्टमॉर्टेम आवश्यक ठरू शकते असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते.

Jai Maharashtra Marathi News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number