पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; भंडारा हादरलं

भंडारा जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्याने व्यथा मांडली होती. त्याच शेतकऱ्याने आता आत्महत्या केली आहे.

पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; भंडारा हादरलं
Bhandara News

राज्य शासनाने टिगर एकमध्ये भंडारा जिल्ह्यातील पवनी लाखांदूर व भंडारा या तीन तालुक्यांचा समावेश केला मात्र उर्वरित चार तालुक्यांमध्ये ही दुष्काळ व धान पिकांवर रोगांचे मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊन पीक नष्ट झाले आहेत त्यामुळे उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळीत समावेश व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. अशातच भंडारा जिल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्याने व्यथा मांडली होती. त्याच शेतकऱ्याने आता आत्महत्या केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धोप येथील 55 वर्षीय शेतकरभंडारा जिल्ह्यातील धोप येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राजेंद्र सपाटे वय 55 वर्ष, यांच्याकडे 5 एकर शेती आहे. पण यंदा पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण धान शेती करपली गेली. पालकमंत्री पंकज भोयर यांनी दुष्काळ पाहणी दौरा वेळी देखील शेतकऱ्यांनी रडत रडत व्यथा मांडली होती. तुमसर, मोहाडी तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळा गेला.

हेही वाचा- दिल्लीत मृत्यूचं तांडव! दोन चिमुकल्यांसह गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत; घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश

शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांच्याकडे आपली व्यथा मांडून देखील त्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्री यांनी नैतिक जबाबदारी समजून आपला राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे. राजेंद्र सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी दुष्काळातून वगळलेल्या तालुक्यांमध्ये भेट दिली मात्र साकोली व लाखनी येथे येऊन सुद्धा ही कोणतेही पिकाची पाहणी केलेली नाही व अद्याप या दोन्ही तालुक्यात कोणतेही पंचनामे अथवा दुष्काळाची अधिकृत पाहणी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त होत आहे शासनाने नुकसानीचे पंचनामे न केल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

Jai Maharashtra Marathi News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number