ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मैत्री तब्बल 50 वर्षांहून अधिक जुनी होती. आज आठ महिन्यांच्या अंतराने हे दोन दिग्गज मित्र पुन्हा एकदा अनंताच्या प्रवासात एकत्र आले आहेत. याच वर्षी 28 जानेवारी रोजी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर आज 8 ऑक्टोबर रोजी कलाविश्वातील नटसम्राट नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी अत्यंत खाजगी ठेवलेली मैत्री आता महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या जिवलग मित्राच्या जाण्याने झालेली पोकळी व्यक्त केली होती.
वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे दोन तरुण मित्र कसे बनले?
नाना पाटेकर ANIला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले की, “अजित पवार 19 – 20 वर्षांचे होते तेव्हापासून माझी आणि त्यांची मैत्री होती. ते मी 25 वर्षांचा आणि शरद पवार 35 वर्षांचे असतील. पन्नास वर्षांचा हा खूप मोठा सहवास होता. जेव्हा जेव्हा ते बारामतीला भेट द्यायचे, तेव्हा अजित पवार त्यांची सर्व कामे सांभाळून घ्यायचे. खूप साऱ्या आठवणी आहेत.कार्यकर्ता म्हणून काम करत होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. जिथून त्यांनी सुरुवात केली आणि ज्या पदापर्यंत झेप घेतली तो प्रवास कमालीचा होता. राजकारण सोडून द्या पण, मी कायम त्यांना मिस करेन. ते माझ्या छोट्या भावासारखे होते. अजित पवार माझे चांगले मित्र होते.”
“सुनेत्रा पवार यांचं दु:ख इतरांपेक्षा वेगळं आहे. ते त्यांनाच सहन करावं लागेल. पण, त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे, त्याची जबाबदारी देखील सांभाळावी लागेल आणि ती जबाबदारी त्या सांभाळतील, पण वेळ तर लागेलच’ त्याचबरोबर, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल विचारलं असता नाना पाटेकर म्हणाले की, ‘रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले.”
#WATCH | Mumbai | On the demise of former Maharashtra Deputy CM Ajit Pawar, Actor Nana Patekar says," We are saddened by it (demise of Ajit Pawar)….It all depends on the two parties (the merger of two factions of the NCP)…I knew him since he was 19-20 years old and had started working as a party worker…I stand with the Pawar family at this time." — ANI (@ANI) February 12, 2026
नाना पाटेकर आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मैत्री ही केवळ राजकारण आणि मनोरंजन क्षेत्राच्या पलीकडे जाणारी होती. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ दोघांमध्ये जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. अनेक वर्षांच्या या मैत्रीत दोघांनी एकमेकांसोबत अनेक सुख-दुःखाचे प्रसंग, गप्पा आणि जुन्या आठवणी शेअर केल्या होत्या. त्यांच्या दीर्घ मैत्रीचा हा प्रवास आणि एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा त्यांच्या चाहत्यांसाठीही कायम स्मरणात राहणारा आहे.
नाना पाटेकरांना अखेरचा निरोप
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते आणि नटसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यातील डोना पावलामधील राहत्या घरी नाना पाटेकरांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मीत जाण्याने मनोरंजनसृष्टी पोरकी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी त्यांच्या निधनावर मनोरंजन क्षेत्रासह राजकारणी नेत्यांनी देखल दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान आता नाना पाटेकर यांच्या अंतिम संस्काराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोनजेगाव भोर तहसील येथील शासकीय इतमामात आज सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे. त्यानुसार पुणे डोणजे गावतच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे डोन्जे येथील निवासस्थानी शासकीय इतमामात नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
Jai Maharashtra Marathi News Live Update