सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजूर मातीच्या ढिगार्‍याखाली; एक जण जखमी तर…

इंदापुर तालुक्यातील राजवडी या ठिकाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रोडचे काम चालू असताना दोन मजूर मातीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले.

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजूर मातीच्या ढिगार्‍याखाली; एक जण जखमी तर…
Indapur News

इंदापुर तालुक्यातील राजवडी या ठिकाणी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्विस रोडचे काम चालू असताना दोन मजूर मातीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले. एकूण या कामावरती पाच लोक काम करीत होते पैकी दोन नाश्ता करायला गेले होते आणि एक बाहेर होता आणि दोन त्या अपघातामध्ये सापडले. यावेळी घटनेची माहिती मिळताच इंदापूर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी तरुणांचा जीव वाचवण्यास मदत केली.

यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा मजूर बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्याचे नाव मश्रपूर शेख आहे तर एक जण सुदैवाने बचावला यात दुर्घटनेत तो बचावला आहे त्याचे नाव नईम अख्तर असून त्याला इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या उजव्या पायाला जखम झाली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं; वैमानिकासह 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

चारही कामगार हे पश्चिम बंगाल येथील आहेत याबाबत काम करत असताना कुठलीही सुरक्षा नसल्याचे जखमी कामगाराने सांगितले आहे. या घटनेवरून ठेकेदाराचा हलगर्जीपणा यात दिसून येत आहे. या घटनेला संबंधित ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता इंदापूर पोलीस ठेकेदारावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंदापूर येथील राजेवाडी घडलेल्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत म्हटलं की, “इंदापूर तालुक्यात राजवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत संरक्षक भिंतीच्या बांधकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून झालेला अपघात अत्यंत भीषण आहे.. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल.”

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number