Parbhani Ganesh Visarjan Accident : परभणीत गणेश विसर्जनाला गालबोट; गोदावरी नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण बुडाले

राज्यात अनंत चतुर्थीनिमित्त गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका जल्लोषात पार पडल्या.

Parbhani Ganesh Visarjan Accident : परभणीत गणेश विसर्जनाला गालबोट; गोदावरी नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण बुडाले
Parbhani Ganesh Visarjan Accident

राज्यात अनंत चतुर्थीनिमित्त गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका जल्लोषात पार पडल्या. मात्र, या उत्सवी वातावरणात परभणीत दुर्दैवी घटना घडली असून गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. गणपती विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा- Prabhadevi Accident : भरधाव कार मिरवणुकीत घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक, 4 जण…; मुंबईच्या प्रभादेवीत विसर्जनादरम्यान थरारक घटना

पालम शहरातील मुंजाजी आश्रोबा घोरपडे (वय अंदाजे 17) आणि गजानन रामदास घोरपडे (वय अंदाजे 20) हे दोन तरुण बाप्पाची मूर्ती घेऊन गणेश मंडळातील कार्यकर्त्यांसह धानोरा काळे तेथे गेले होते. दरम्यान बाप्पाची मूर्ती विसर्जन करत असताना दोन्ही तरुणांचा पाय घसरून तोल गेला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना नदीबाहेर काढण्यासाठी तीन ते चार युवकांनी पाण्यात उड्या घेतल्या.

घटनास्थळी पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदित्यकुमार लोणीकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. रात्री उशिरापर्यंत सदर मुलांचा शोध सुरू होता. ही घटना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धानोरा काळे (ता. पूर्णा) येथे घडली. दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरू असताना परभणीतील या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदी, तलाव आणि खोल पाण्यात विसर्जन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number