Thursday, July 17, 2025 03:24:39 AM

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली; राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत यावर नारायण राणे भाष्य केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली.


बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली राणेंची ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत यावर नारायण राणे भाष्य केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवली. राज हे ठाकरे गटात आले तर उद्धव ठाकरे संपतील अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं?'
ठाकरे बंधू एकत्र चर्चा जोरदार रंगल्या आहेत. यावरुन उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. राज हे ठाकरे गटात जाणार नाहीत. राज जर ठाकरे गटात आले तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपेल. बाळासाहेबांचं यश उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत संपवलं अशी टीका राणे् यांनी ठाकरेंवर केली आहे. राज ठाकरेंना 'मातोश्री'चा थोडा भाग देणार का? असा प्रश्न राणेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य व्यक्तिमत्व असल्याची बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

हेही वाचा: वारीतल्या अर्बन नक्षलवादावर राजकीय मंडळींची प्रतिक्रिया

'कोण कोणाकडे जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय' 
राज ठाकरे पक्षात असताना उद्धव ठाकरेंनी खूप छळलं आहे. त्यांना सोडण्याची इच्छा नव्हती मात्र प्रवृत्त केलं. कुटुंब म्हणून किती जणांना जवळ उद्धव ठाकरेंनी केलं. दोन भावांनी एकत्र यावं मात्र बाहेर जायला उद्धव ठाकरेंनी प्रवृत्त केलं. जाहिराती वातावरण विजयोत्सव साजरा करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना हिंदीचा निर्णय केला. उलट फडणवीस यांचे अभिनंदन केले पाहिजे तर मेळावा करताय. कोण कोणाकडे जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असे नारायण राणेंनी म्हटले आहे. पुढे बोलताना, स्वत:मध्ये कर्तृत्व नाही. आजच मराठी त्यांना आठवले. मुंबईत फक्त 18 टक्के मराठी उरलेत, 1960 मध्ये 60 टक्के होते. दोन दिवस मंत्रालयात ठाकरे आलेत, तरुणांसाठी रोजगारासाठी काय त्यांनी केलं असा प्रश्न उद्धव यांना राणेंनी केला. मराठी माणसाने आधार दिला. मराठी भाषेवरुन आनंदोत्सव साजरा करतायत. स्वत:चे अस्तित्व काही उरलेलं नाही. त्यांची शिवसेना डुप्लिकेट आहे, ओरीजनल शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.  


सम्बन्धित सामग्री