IMD Alert: राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाण पाऊस कोसळत आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने काय म्हटलं आहे ?
अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती: 40–50 किमी/तास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाण्याचे टाळावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र: पुढील दोन दिवसांत तीव्र होऊन चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. 27 ऑक्टोबरला हे चक्रीवादळ तयार होऊन आंध्र प्रदेश व ओडिशा किनारपट्टीकडे सरकण्याचा अंदाज आहे. या दोन्ही प्रणालींच्या परिणामामुळे महाराष्ट्रात किनारपट्टीसह आतील भागांमध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi On Phaltan Doctor Case : भाजप सरकारचा अमानवीय आणि असंवेदनशील चेहरा समोर, सातारा डॉक्टर प्रकरणी राहुल गांधींचा निशाणा
पुढील 4 दिवसांची जिल्हानिहाय पावसाची शक्यता
26 ऑक्टोबर: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी.
27 ऑक्टोबर : मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
28 ऑक्टोबर : रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. उर्वरित सर्व जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता.
29 ऑक्टोबर: संपूर्ण विदर्भ, नांदेड (मराठवाडा), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर (कोकण) साठी पावसाचा येलो अलर्ट जारी.
समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे
अरबी समुद्रात: सध्या तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 3- 4 दिवस उत्तर दिशेकडे सरकणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
हेही वाचा - Fish Prices Increases: खवय्ये हैराण! सुरमई-पापलेटचे भाव गगनाला भिडले
आग्नेय बंगाल उपसागरात: कमी दाबाच्या पट्ट्याचे 48 तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश व ओडिशा किनारपट्टीकडे सरकणार आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या सुरुवातीस हवामान स्थिर होईल, परंतु पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे.