Fish Prices Increases: समुद्रकिनाऱ्यावरील मासळीप्रेमींसाठी निराशाजनक बातमी आहे. गेल्या आठवड्याभरात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, बाजारात माशांची आवक थांबली असून सुरमई, पापलेट, बांगडा यांसारख्या लोकप्रिय माशांचे दर अक्षरशः दुप्पट-तिप्पट झाले आहेत.
समुद्रात वारे अन् किनाऱ्यावर निराशा
दरम्यान, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने खोल समुद्रात गेलेल्या शेकडो मासेमारी नौका देवगड, मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरी आणि गुजरातच्या बंदरांकडे परतल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून एकही बोट समुद्रात न गेल्याने बाजारात मासळीचा पुरवठा शून्यावर आला आहे. त्यामुळे रविवारी नेहमीसारखा मासेमारीचा मेजवानी दिवस ही खवय्यांसाठी निराशाजनक ठरला.
हेही वाचा - Mira Bhayandar Marathi Language Insult: भाईंदर मध्ये छटपूजेच्या मीटिंग दरम्यान मराठी भाषेचा अपमान; मराठमोळे आयपीएस अधिकारी चव्हाण यांनी हिंदीतच बोलण्याचा धरला अट्टाहास
माशांचे दर गगनाला भिडले
सामान्यतः 700 ते 800 रुपयांत मिळणारी सुरमई आता 1600 रुपयांच्या घरात, तर पापलेटचा दर 2000 रुपयांहून अधिक गेला आहे. आम्ही रविवारी खास मासे घ्यायला आलो होतो, पण एवढे भाव ऐकून परतलो, असं एका स्थानिक ग्राहकाने सांगितलं.
हेही वाचा - Phaltan Doctor Case : फलटण महिला डॉक्टर अत्याचारप्रकरणात नवे वळण! दानवेंनी दाखवले पुरावे; निंबाळकरांवर गंभीर आरोप
कोकणात रस्ते वाहतुकीवरला वादळाचा फटका
समुद्रातील प्रतिकूल हवामानासोबतच गेल्या दोन दिवसांपासून कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. वरंध घाट चिखलमय झाला असून वाहनांची वाहतूक मंदावली आहे. भोर तालुक्यातील वादळी वारे आणि पावसामुळे रस्त्यावरील मातीचा खच मुख्य मार्गावर आला आहे. तसेच देवघर ते वेणूपुरी मार्ग पूर्णपणे चिखलात बदलला असून, ट्रक आणि बस रुतून बसल्याचे प्रकार घडले आहेत. क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.