पुणे: राजेंद्र हगवणेंची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. नुकताच, बुधवारी हगवणे कुटुंबीयांना कोर्टात हजर केले होते. तेव्हा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टासमोर करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी हगवणेंच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना विचारले की त्यांना पोलिस कोठडीत पोलिसांकडून काही त्रास झाला होता का? तेव्हा पाचही आरोपींनी 'नाही' असे उत्तर दिले. मात्र,कोर्टाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. या प्रकरणी, आरोपी वैष्णवीचा पती शशांक, आई लता आणि नणंद करिश्मा यांच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या वकिलांची मागणी:
फिर्यादीच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यांना या प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असू शकते. त्यासोबतच, आरोपींनी हुंडा म्हणून मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे, ज्याची माहिती मिळवायची आहे. दरम्यान, आरोपींना वैष्णवीला मारहाण करण्यासाठी वापरलेली शस्त्रे आणि रॉड जप्त करायचे आहेत. त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांनी आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, कोर्टाने पोलिस कोठडीत वाढ केली आहे.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट; नवरा, सासू आणि नणंदेला गुरुवारी कोर्टात करणार हजर
हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद:
'आरोपींना पोलिस कोठडीची आवश्यकता नाही', असा युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयात वैष्णवीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. फिर्यादीच्या वकिलांकडून लावण्यात आलेल्या आरोपांवर हगवणेंच्या वकिलांनी कोर्टात भाष्य करत म्हणाले की, 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते', 'त्या मुलाचा साखरपुडा 18 तारखेला झाला होता, त्यासाठी वैष्णवी कॉल करत होती', 'वैष्णवीला समोरच्या व्यक्तीनं नकार दिला असेल, म्हणून तिने आत्महत्या केली असेल', 'वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती'.
हेही वाचा: 'मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा'; महिला आयोगाचे फडणवीसांना पत्र
पुढे हगवणेंच्या वकिलाने कोर्टात अनेक सवाल उपस्थित केले की, 'यापूर्वीही वैष्णवीने एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता', 'एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता?', 'नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का?', 'प्लॅस्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का?'.
यानंतर, हगवणे कुटुंबीयांची बाजू घेत वकील म्हणाले की, 'हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग ते 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी वैष्णवीचा छळ का करतील? हगवणे कुटुंबाचे सोने कौटुंबिक व्यवसायासाठी गहाण ठेवले आहे. सोन्याच्या दागिन्यांविषयी मीडियात चुकीचं सांगितलं जात आहे', असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केला आहे.