Wednesday, June 18, 2025 03:42:58 PM

Vaishnavi Hagawane suicide case: राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी

वैष्णवी हगवणे हिचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे.

vaishnavi hagawane suicide case राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी

पुणे: पिंपरी चिंचवड येथील 23 वर्षीय विवाहित वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला. दरम्यान, आता वैष्णवी हगवणे हिचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे. 

राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. यावेळी बोलताना सुरज चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांचे पुणे सीपी यांच्यासोबत बोलणं झाले आहे. अजित पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा असं म्हणतात, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल, असेही सुरज चव्हाण म्हणाले. 

हेही वाचा : Vaishnavi Hagwane case : वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द

अजित पवारांनी दिले कारवाईचे निर्देश   
"राजेंद्र हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवारांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता, माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित पवारांनी वारंवार सभेमध्ये दिलेल्या आहेत. हगवणे प्रकरणामध्ये सुद्धा अजित पवारांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. माध्यमांना माझी विनंती आहे, या प्रकरणाला पक्षीय रूप न देता याला न्यायाच्या भूमिकेतून पहावे, असेही सुरज चव्हाण म्हणाले.

26 मे पर्यंत पोलिस कोठडी 
जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते पैसे न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करत 26 मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.


सम्बन्धित सामग्री