Vastu Tips For Government Job: आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. दिवस-रात्र अभ्यास करूनही अनेकदा अपयश येतं, ज्यामुळे मनात निराशा आणि शंका निर्माण होते 'कदाचित माझं नशीबच नाही!' मात्र वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील काही गोष्टी तुमच्या मनःशांती, एकाग्रता आणि सकारात्मक उर्जेवर प्रभाव टाकतात. योग्य दिशेने मेहनत आणि सकारात्मक उर्जा मिळाली, तर यश लांब नाही राहत.
ज्योतिषाचार्य संजीत कुमार मिश्रा यांनी अशाच काही प्रभावी वास्तु उपायांबाबत मार्गदर्शन केलं आहे, जे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
हेही वाचा: Atichari Guru Gochar 2025: दिवाळीपूर्वीच लक्ष्मीचा वर्षाव; 'या' तीन राशींवर राशींवर अतिचारी गुरुची विशेष कृपा
1. अभ्यासाची दिशा बदला
वास्तुशास्त्रानुसार, अभ्यास करताना चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा. या दिशांमध्ये सकारात्मक उर्जा असते, जी स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते. अभ्यास करताना पाठीमागे भिंत असावी, जे स्थैर्य दर्शवतं.
वास्तु टिप: अभ्यासाच्या टेबलसमोर देवी सरस्वतीची प्रतिमा किंवा प्रेरणादायक विचार लावल्यास अभ्यासाची प्रेरणा वाढते.
2. स्टडी टेबलवर ठेवा विशेष वस्तू
सरकारी नोकरीसाठी मेहनत करताना, स्टडी टेबलवर पिवळ्या फुलांचं गुलदस्ता किंवा क्रिस्टल बॉल ठेवावा. पिवळा रंग सरस्वती देवीचा आहे आणि क्रिस्टल बॉल एकाग्रता वाढवतो.
वास्तु टिप: फुलं सुकल्यावर त्वरित बदलावीत, कारण सुकलेली फुलं नकारात्मक ऊर्जा पसरवतात.
हेही वाचा: Shani Vakri 2025: सावधान! शनीच्या वक्री चालीमुळे 'या' तीन राशींना होणार प्रचंड त्रास; जाणून घ्या उपाय
3. दक्षिण-पश्चिम कोन स्वच्छ ठेवा
वास्तुशास्त्रात दक्षिण-पश्चिम कोन (South-West corner) हा करिअर आणि स्थिरतेचा कोन मानला जातो. या भागात अस्वच्छता, अस्ताव्यस्तपणा किंवा कचरा ठेवणे टाळा.
वास्तु टिप: या कोपऱ्यात लाकडी ग्लोब किंवा भारताचा नकाशा ठेवा, जो तुमच्या लक्ष्याची आठवण करून देईल.
4. प्रत्येक सकाळी करा मंत्रजप
अभ्यास किंवा कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, दररोज सकाळी एक दिवा लावा आणि 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा 11 वेळा जप करा. हा मंत्र अडथळे दूर करून यश आणि स्थैर्य देतो.
वास्तु टिप: शक्य असल्यास घरात किंवा बाल्कनीत तुलसीचे रोप ठेवावे. ते सकारात्मक उर्जा वाढवते.
5. शनिवारी करा विशेष उपाय
जर नोकरीच्या मार्गात वारंवार अडथळे येत असतील, तर शनिवारी पीपळाच्या झाडाखाली सरसोंच्या तेलाचा दिवा लावा आणि शनी मंत्राचा जप करा.
वास्तु टिप: त्या दिवशी काळे चणे, लोखंडाचे वस्तू किंवा काळे कपडे गरजू लोकांना दान करा.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मेहनत, तयारी आणि चिकाटी महत्त्वाची असली तरी, वास्तुशास्त्राचे हे छोटे उपाय तुमचं मन, दिशा आणि उर्जा एकत्र करून तुमचं नशीब उजळवू शकतात. योग्य तयारीसोबत योग्य दिशा आणि सकारात्मक उर्जा मिळाल्यास यश निश्चितच मिळतं.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)