Monday, November 17, 2025 12:16:28 AM

Govardhan Asrani Death: ही होती असरानी यांची शेवटची इच्छा; मृत्यूपूर्वीच पत्नीला दिल्या होत्या या खास सूचना...

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन झाले आहे आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार कुटुंबाने शांतपणे अंत्यविधी पार पाडले आहेत.

govardhan asrani death ही होती असरानी यांची शेवटची इच्छा मृत्यूपूर्वीच पत्नीला दिल्या होत्या या खास सूचना

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ते काही काळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते आणि मुंबईतील आरोग्य निधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र कल त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
सर्वांत विशेष म्हणजे असरानी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शांतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा अंत्यविधीनंतरच करण्यात आली, ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की असा निर्णय का घेण्यात आला? तर उपलब्ध माहितीनुसार असं समजतंय की, असरानी यांनी मृत्यूपूर्वीच आपल्या पत्नी मंजू असरानी यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की त्यांच्या निधनानंतर कोणताही गोंधळ, गर्दी किंवा माध्यमांमध्ये गाजावाजा होऊ नये. म्हणूनच, त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने मर्यादित उपस्थितीत अंत्यविधी पार पाडला.

हेही वाचा: Actor Asrani Passes Away: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 
त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त कुटुंबातील काही जवळचे सदस्यच उपस्थित होते. अंत्यविधी पार पडल्यानंतरच त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी अधिकृतरीत्या जाहीर केली.
 
सामाजिक जीवनासोबतच असरानी हे सोशल मीडियावरही सक्रीय होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. निधनाच्या काही तास आधीच त्यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्येही त्यांनी सकारात्मकता आणि आनंदाचा संदेश दिला होता.

असरानी यांनी 1967 मध्ये “हरे कांच की चुडियाँ” या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले होते. त्यांच्या कारकिर्दीत शोले, छोटी सी बात, चलती का नाम गाडी यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. आज ते आपल्या चाहत्यांच्या आणि चित्रपटसृष्टीच्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.


सम्बन्धित सामग्री