एकीकडे ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद, दुसरीकडे मनसे-ठाकरे गटात राडा; नेमकं काय घडलं?

विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद.

एकीकडे ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद, दुसरीकडे मनसे-ठाकरे गटात राडा; नेमकं काय घडलं?

मुंबईतील विक्रोळी परिसरात गणपती मिरवणुकीतील सलामीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी इमरान शेख यांनी गणपतीला सलामी देऊ नये, यासाठी अग्निशमन दलाला धमकी दिल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले.

मनसेच्या म्हणण्यानुसार, विक्रोळी परिसरात गणपती मिरवणुकीदरम्यान अग्निशमन दलाकडून सलामी देण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा या परंपरेत खंड पडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. यामागे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अग्निशमन दलावर दबाव आणल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकाराचा निषेध करत मनसेने अग्निशमन दलाला पुन्हा सलामीची परंपरा सुरू करण्याबाबत पत्र दिल्याचे सांगितले आहे.

या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. या घटनेमुळे विक्रोळी परिसरातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत ठाकरे गटाची बाजू काय आहे, याकडेही लक्ष लागले आहे.

या वादाची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आगामी राजकीय कार्यक्रमांकडेही लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांनी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली असून, निवडणूक प्रक्रियेतील SIR संदर्भातील मुद्द्यांवरून हा कार्यक्रम होणार आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number