विशाखाने पूर्ण केले नम्रताचे स्वप्न

मुंबई , ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. यातील सगळ्याच कलाकारांवर प्रेक्षक भरघोस प्रेम करतात. आहस्तच हास्य जत्रेचा एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. हास्य जत्रेत नम्रताने साकारलेली सगळीच पात्रे खूप गाजली. मग ती ‘लॉली’ असो, ‘आई’ असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले ‘पावली’ […]

विशाखाने पूर्ण  केले नम्रताचे स्वप्न

मुंबई , ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. यातील सगळ्याच कलाकारांवर प्रेक्षक भरघोस प्रेम करतात. आहस्तच हास्य जत्रेचा एक अविभाज्य घटक म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. हास्य जत्रेत नम्रताने साकारलेली सगळीच पात्रे खूप गाजली. मग ती ‘लॉली’ असो, ‘आई’ असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले ‘पावली’ हे पात्र असो. तिच्या प्रत्येकभूमीएक्ने प्रेक्षांचे मनोरंजन केले आहे. अशातच तिची एक पोस्ट सध्या इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.

गेल्या वर्षी ‘कुर्ररर’ हे नाटक आपल्या भेटीला आले. सध्या या नाटकाचा विदेश दौरा सुरू असून या नाटकाची संपूर्ण टीम अमेरिकेमध्ये गेली आहे. यावेळी अभिनेत्री नम्रतासोबत विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे हे देखील आहे. याच दौऱ्यातला एक फोटो नम्रताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असत कात त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहे.


आपल्या पोस्टमध्ये ती म्हणाली,” The excitement of dreams coming true is beyond the description of words (स्वप्न साकार होण्याचा उत्साह शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा आहे..) एकेकाळी फक्त स्वप्न रंगवलं होतं अमेरिकेत जाण्याचं, आणि आज इथे येऊन मनोरंजन करायला मिळतंय आणि मनसोक्त फिरायला देखील मिळतंय.. विशाखा ताई तुझे खूप खूप आभार[… माझ्या अनेक स्वप्नांपैकी हे एक स्वप्न पूर्ण करण्याबद्दल”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number