Washim News: तुकाराम मुंडेंचा नॉनस्टॉप धडाका! वाशिममध्ये एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा साठा जप्त करत माफियांवर मकोका

वाशिममध्ये गुटखा माफियांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रशासनाने मुख्य आरोपींविरोधात अत्यंत कडक कायदेशीर पाऊल उचलले आहे.

Washim News: तुकाराम मुंडेंचा नॉनस्टॉप धडाका! वाशिममध्ये एफडीएची मोठी कारवाई; 1.13 कोटींचा साठा जप्त करत माफियांवर मकोका

FDA Raid in Washim: वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अवैध गुटखा विक्री आणि खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. प्रशासनाने जिल्ह्यातील 12 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तब्बल 1.13 कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेते आणि भेसळखोर व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

गुटखा नेटवर्क उद्ध्वस्त अन् मुख्य आरोपींवर मकोका
जिल्ह्यातील गुटखा माफियांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रशासनाने मुख्य आरोपींविरोधात अत्यंत कडक कायदेशीर पाऊल उचलले आहे. या विशेष मोहिमेदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या कारवाया खालीलप्रमाणे आहेत:
– कारंजा येथून तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर गुटखा साठा हस्तगत करण्यात आला.
– रिसोड परिसरातून सुमारे 5 लाख रुपये किमतीचा साठा एफडीएच्या पथकाने जप्त केला.
– या गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या मुख्य आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेल्स व डेअरींवर धाडी; 72 अन्न नमुने जप्त
गुटखा साठ्याव्यतिरिक्त नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवरही एफडीएने आपला बडगा उगारला आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स आणि डेअरींची कसून पाहणी करण्यात आली. विशेषतः दररोजच्या वापरातील आणि सणासुदीत मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या खवा, तूप, पनीर व दही यांसारख्या 72 पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून, यांची एकूण किंमत 2,02,000 रुपये आहे.

हेही वाचा – Crime Patrol Satish Naikode: काय उरलं आयुष्यात? डोंबिवली गहाण, 25 लाखांचा गंडा; 'क्राइम पेट्रोल'चा 'पोलीस'च ट्रॅपमध्ये अडकल

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कठोर कायदेशीर कारवाई
जप्त केलेले सर्व अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या मोहिमेबाबत माहिती देताना वाशिम एफडीएचे सहआयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले की, नागरिकांच्या जिवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. प्रयोगशाळेचा अहवाल हाती आल्यानंतर ज्यांचे नमुने भेसळयुक्त किंवा अमानक आढळतील, त्यांच्यावर कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल.

व्यापाऱ्यांमध्ये खळबळ आणि पुढील मोहिमेचे संकेत
अन्न व औषध प्रशासनाच्या या धाडसी कारवाईमुळे वाशिम जिल्ह्यातील भेसळखोर व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. आगामी काळातही ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यात ही तपासणी मोहीम अशाच तीव्रतेने सुरू ठेवली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – Doctors Strike : महाराष्ट्रात लाखो डॉक्टरांचा एल्गार! मुंबईतील KEM, सायन, नायर रुग्णालयांमध्ये OPD बंद; आरोग्यसेवा विस्कळीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number