Weather Update: कडाक्याच्या उन्हाळ्यात मोठा बदल होणार! विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुफान गारपीट; कोकण किनारपट्टीवर…

एकीकडे कडाक्याची उष्णता असताना दुसरीकडे हवामानात मोठे बदल घडत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला आहे.

Weather Update: कडाक्याच्या उन्हाळ्यात मोठा बदल होणार! विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुफान गारपीट; कोकण किनारपट्टीवर…

एकीकडे कडाक्याची उष्णता असताना दुसरीकडे हवामानात मोठे बदल घडत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 6 ते 7 मे पर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिस्थितीत अंगाची लाहीलाही आणि घामाच्या धारा वाहणार आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून ‘पश्चिमी विक्षोभ’ (Western Disturbance) तयार झालेलं असून ते वारे हळूहळू भारताच्या दिशेने वळत आहेत.

बदलणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. या बदलत्या वाऱ्यांमुळे आता भारतीय हवामान विभागाने 7 जिल्ह्यांना यलो तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. तर दुसरीकडे विदर्भ-मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात 50 किमी ताशी वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान गारपीट आणि वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ऑरेंज ते यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा- Chennai Airport Incident : अस्वस्थ वाटलं, घाबरला अन् त्याने थेट धावत्या विमानातून उडी मारली! 231 प्रवाशांचा जीव टांगणीला; लँडिग पूर्वीच एअरपोर्टवर घडला विचित्र प्रकार

यावेळी कोकणात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस राहणार असून वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वोत्तर भारतातील काही भागात वेस्टर्न डिस्त्रबची स्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम मध्य भारतात होण्याची शक्यता वर्तावली आहे. यावेळी विदर्भात ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहून अवकाळी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ येथे कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 ते 30 अंशांच्या आसपास आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीची ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number