सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. साताऱ्यातील 'हॉटेल फर्न'मध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची औपचारिक बैठक पार पडली, ज्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.
हेही वाचा- Thane : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू
या बैठकीला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील,खासदार नितीन पाटील, शिवसेनेचे नेतेसंजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण या बैठकीला उपस्थित होते.जिल्हा परिषदेचा कौल पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे सत्तेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ असल्यामुळे. स्थानिक राजकारणात भाजपचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री मकरंद पाटील यांनी "जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी ही केवळ प्राथमिक चर्चा असल्याचे स्पष्ट केले असून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनीही सत्तास्थापने संदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.