यवतमाळ जिल्ह्यात 94 जणांची कोरोनावर मात ; 44 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 11 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 94 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 487 रिपोर्ट प्राप्त झाले. […]

यवतमाळ जिल्ह्यात 94 जणांची कोरोनावर मात ; 44 नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 11 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 94 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 487 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 443 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 284 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10633 झाली आहे.

आज 94 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9747 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 354 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 95899 नमुने पाठविले असून यापैकी 95695 प्राप्त तर 204 अप्राप्त आहेत. तसेच 85062 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number