नाशिक : नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्यानं तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नाशकात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे.
नाशिक शहराच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आली आहे. तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत एका तरुणाचा जीव घेतला आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा : माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांवर पैसे घेऊन पदं वाटल्याचा गंभीर आरोप
बहिणीला प्रपोज केला म्हणून भावासह त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. नसीम शहा असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास घटना घडली होती. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. बहिणीला प्रपोज टाकतो का ? असे विचारत बेदम मारहाण केली होती. मारहाणीत डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.