महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी राज्याभरात मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह सर्वत्र सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. दरम्यान या निवडणुकीत एका साध्या पण गंभीर विषयावर वाद निर्माण झाला आहे. मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई. मतदारांनी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई सहज पुसली जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा-Pune Exit Poll Result 2026 : कोण होणार पुण्याचा कारभारी? अजित पवारांना धक्का, तर भाजपची सरशी; दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या व्हिडिओंमध्ये मतदारांनी नेलपेंट रिमूव्हर किंवा सॅनिटायजर वापरून बोटावरील शाई कशी लगेच निघते ते दाखवले आहे. हे व्हिडिओ पाहून मतदार आणि विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानानंतर लावली जाणारी शाई काही दिवस बोटांवर राहायची. पाणी, साबण किंवा डिटर्जंट वापरूनही ती सहज निघायची नाही. मात्र, या निवडणुकीत काही ठिकाणी मार्करद्वारे शाई लावली जात असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे काही मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी या प्रक्रियेला प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हेही वाचा- BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत सत्तापालट? तर ठाण्यात शिंदेंनी गड राखला; एक्झिट पोल्सचे आकडे समोर
अशातच महानगरपालिका निवडणुकांचा आज निकाल लागला की, सर्वांच लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे असेल, मात्र महापालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या या वादाचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता पुन्हा 'म्हैसूर' पॅटर्न वापरायचे ठरवले आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग वर्षानुवर्षे वापरली जाणारी कर्नाटकातील 'म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लि.' या कंपनीची शाई वापरण्याचा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडसह हैद्राबाद येथील रायुडू लॅबोरेटरी येथे तयार केली जाते. या कंपनीची शाई अत्यंत खात्रीशीर मानली जाते. आता महानगरपालिका निवडणुकांतील शाईवरून झालेला गोंधळ पाहता राज्य निवडणूक आयोगानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी म्हैसूर पेंट्सच्या शाईच्या बाटल्यांचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत.