महाराष्ट्र: महाराष्ट्रात राजकीय घडामोडी नेहमीच बदलत असतात. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतलीय. विशेष म्हणजे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एक तास चर्चा झाल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरूय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व असल्याचं देखील बोललं जातंय. राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही असं जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हंटले असले तरी देखील राजकीय वर्तुळात या भेटीने चर्चेला उधाण आलंय. 'राज ठाकरेंसोबत केवळ मैत्री, त्यासाठी घरी गेलो होतो'. राज ठाकरेंसोबत मैत्रिपूर्ण गप्पा झाल्या असं स्पष्टीकरण देखील फडणवीसांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिलंय.
त्यातच आता विशेष म्हणजे अमित ठाकरेंना भाजपा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सर्वत्र चर्चा आहे. भाजप कोट्यातून अमित ठाकरेंना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत राज आणि फडणवीसांच्या भेटीने याची शक्यता आणखीनच वाढणार असल्याचं बोललं जातंय. आगामी पालिका निवडणूकांसाठी भाजपची रणनिती आहे. त्यातच
मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपची तयारी असल्याचं समोर आलं असून राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून अमित ठाकरे विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचा: कोहली आणि शमीचा खराब फॉर्म भारतासाठी त्रासदायक ?
फडणवीस-राज भेटीत काय झालं?
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर फडणवीसांनी भेट घेतली
फडणवीस-राज ठाकरेंमध्ये सुमारे तासभर चर्चा
आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाल्याची माहिती
अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदारकीची ऑफर असल्याच्या चर्चा
भाजपाच्या कोट्यातून अमित ठाकरेंना आमदारकी मिळण्याची शक्यता
अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळण्याचा अंदाज
आगामी निवडणुकांबाबत वाटाघाटींवर चर्चा झाल्याची माहिती
त्यातच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय 'राज ठाकरेंनी कॅफे सुरु केलाय, अनेक जण चहा प्यायला येतात' अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीस-राज भेटीवर टीका केलीय.