राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांवर ड्रोनच्या सहाय्याने देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांबाहेरही व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे, जेणेकरून गैरप्रकार टाळता येतील. विद्यार्थ्यांना नकल करण्यापासून रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले असून, कोणीही गैरप्रकार करताना आढळल्यास त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे.
यंदाच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. परीक्षा केंद्रांवर नियुक्त केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आणि इतर संबंधित घटकांची ओळख फेशिअल रिक्गनिशन सिस्टीमच्या माध्यमातून पडताळली जाणार आहे. या यंत्रणेद्वारे फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय, प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार असून परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडल्यास त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 21फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षांदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि शिक्षण विभाग सतर्क राहणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
महिला सन्मान बचत योजनेसाठी शेवटची संधी! गुंतवणुकीसाठी फक्त 31 मार्चपर्यंत वेळ
ड्रोन निगराणीमुळे परीक्षा केंद्रांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी केंद्रांवरील सर्व सुविधा तपासल्या जातील. तसेच, परीक्षा केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त, भरारी पथके आणि बैठी पथके कार्यरत असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी योग्य तयारी करून नैतिक मार्गाने यश मिळवावे, अन्यथा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना कठोर शिक्षा भोगावी लागेल.