भारतातील अनेक महिलांना लाडकी बहीण सारख्या योजनांचा लाभ घेण्यात आला या योजनेला उत्तम असा प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळाला मात्र आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांकडे आता केवळ 31 मार्च 2025 पर्यंतच वेळ आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये या योजनेबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे ही योजना 1 एप्रिल 2025 पासून बंद होण्याची शक्यता आहे. अनेक राज्य सरकारे महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असताना, केंद्र सरकारकडूनही महिलांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणतीही नवीन योजना जाहीर झाली नाही आणि MSSC योजनेची मुदत वाढवण्यावरही सरकारने काहीही भाष्य केले नाही.
हेही वाचा: MahaKumbh Mela 2025 : हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना; पवित्र त्रिवेणी संगमात पंतप्रधान मोदींनी केले स्नान
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि महिलांना बचतीसाठी उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाते. या योजनेत 7,5% दराने व्याज मिळते आणि कमीत कमी 1,000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे, कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेची मुदत फक्त दोन वर्षांची असल्याने अल्पमुदतीच्या गुंतवणुकीसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो. आता केवळ काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने, ज्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी 31 मार्चच्या आत गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा!
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.