लखनौ: उत्तर प्रदेश सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महिलांना प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता महिलांच्या नावावर 1 कोटी रुपयांपर्यंत मालमत्ता खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
या निर्णयामुळे महिलांना आता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक बचत होऊ शकते. यापूर्वी ही सवलत फक्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेसाठी लागू होती. त्यावेळी महिलांना सुमारे 10 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत होती.
हेही वाचा - 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवसापासून लागू होणार आठवा वेतन आयोग
सध्या उत्तर प्रदेशात मालमत्तेच्या खरेदीवर 7 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. मात्र, महिलांच्या नावावर खरेदी केल्यास आता फक्त 6 टक्के शुल्क भरावे लागेल. राज्याच्या मुद्रांक विभागाने हा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मंगळवारी लोकभवनात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीत एकूण 38 प्रस्ताव मांडण्यात आले, त्यापैकी 37 प्रस्तावांना मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.
हेही वाचा - मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला आग
हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक सकारात्मक आणि ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.