Friday, May 24, 2024 08:52:48 AM

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

पनवेल , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पनवेलमध्ये कोन गावाजवळील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर डंपर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलं आहे. कोनगाव ते पळस्पे फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं दिसत आहे. वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री