Friday, June 13, 2025 06:26:59 PM

गडकरींची धुळ्यात सभा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळ्यात सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील किसान हायस्कूलच्या मैदानावर ही दुपारी

गडकरींची धुळ्यात सभा 
NITIN GADKARI

धुळे, १७ मे २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळ्यात सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील किसान हायस्कूलच्या मैदानावर ही दुपारी सभा होणार आहे. धुळे जिल्ह्यात भाजपाचे सुभाष भामरे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर रहमान यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.


सम्बन्धित सामग्री