Sunday, August 17, 2025 05:13:24 PM

पुन्हा नाशिक दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.

पुन्हा नाशिक दौरा 

नाशिक, १६ मे २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. 
गुरुवारी, १६ मे रोजी नाशकात एकनाथ शिंदे यांची प्रचार फेरी होणार आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. नाशिकच्या जागेसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून लक्ष घालत आहेत. बुधवारच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे शिउबाठाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 
देशभरात २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. 


सम्बन्धित सामग्री