मुंबई : माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. ही माहिती उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी पूर्ण केल्यावर आता विभागाने उघड चौकशीसाठी परवानगी मागितली आहे. उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची अशा प्रकारे चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गुप्ता यांच्याकडे बहिशेबी मालमत्ता किती?
सांताक्रुझ येथे 22 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅट आहे. पुण्यात तब्बल 25 कोटीचा आलिशान व्हिला आहे. उघड चौकशी केल्यावर अधिक तपशील येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : सुखानं खाऊ दिलं नाही तर...; जरांगेंचा सरकारला इशारा
माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी सुरू करण्यात आली होती.सुधीर आल्हाट हे पुण्यातील भाजपचे पदाधिकारी असूनशिवाजी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणात अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार त्यांना अटक झालेली होती. या प्रकरणात काही महिने आल्हाट तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी गुप्ता यांच्याबद्दल माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडे अशी मालमत्ता सापडल्यावर त्यांच्या सेवाकाळातील कर्तव्याबाबत शंका निर्माण होते. याप्रकरणी सखोल चौकशीअंती एका अधिकाऱ्याकडे अशी मालमत्ता कशी जमा झाली याचा अधिकृत उलगडा होऊ शकेल.