Sunday, April 20, 2025 05:05:00 AM

साताऱ्यात कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 होणार; संस्कृती, साहस आणि ग्रामीण विकासाचा परिपूर्ण संगम

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चे आयोजन  दौलत नगर, पाटण येथे करण्यात येत आहे.

साताऱ्यात कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 होणार संस्कृती साहस आणि ग्रामीण विकासाचा परिपूर्ण संगम

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चे आयोजन  दौलत नगर, पाटण येथे दि. 15 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान करण्यात येत आहे. शेती, ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा महोत्सव ग्रामीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या महोत्सवात सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना, पर्यटकांना आणि उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात येत आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 हा संस्कृती, साहस आणि ग्रामीण विकासाचा परिपूर्ण संगम आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महोत्स व ठरेल अशी माहिती पर्यटन मंत्री  शंभूराज देसाई यांनी  दिली.

महोत्सवाची वैशिष्ट्ये:

कृषी प्रदर्शन: शेतकऱ्यांना आपली उत्पादने, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि नवीन संशोधन मांडण्याची संधी. शेतीशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन

प्राणी आणि पक्षी प्रदर्शन: स्थानिक पशुधन आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे प्रदर्शन, तसेच पशुपालकांसाठी मार्गदर्शन

आनंद मेळा: सर्व वयोगटांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम, खाद्यपदार्थांचे दालन आणि स्थानिक हस्तकलांचे प्रदर्शन

महिला बचत गटांचे दालन: महिला उद्योजकांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ, तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम

साहसी उपक्रम: घोडेस्वारी, जलक्रीडा आणि इलेक्ट्रिक बग्गी राईड्स यांसारखे उपक्रम

सांस्कृतिक कार्यक्रम: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, नृत्य आणि संगीताचे सादरीकरण

हेही वाचा : मुंबईतील टँकरचालकांचा संप अखेर मागे

महोत्सवाचे उद्दिष्ट:

हा महोत्सव शेतकऱ्यांना फायदा, महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक संस्कृती आणि परंपरांचे जतन करत पर्यटकांना ग्रामीण महाराष्ट्राचे सौंदर्य अनुभवण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल.

 

 

 


सम्बन्धित सामग्री