Friday, April 25, 2025 09:14:48 PM

Kunal Kamra Show Controversy: कोण आहे कुणाल कामरा? आत्तापर्यंत कोणते कॉमेडियन वादात?

कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच चर्चेत आलाय. कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं गायलंय आणि यातूनच राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय.

kunal kamra show controversy कोण आहे कुणाल कामरा आत्तापर्यंत कोणते कॉमेडियन वादात

कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच चर्चेत आलाय. कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं गायलंय आणि यातूनच राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचं म्हणत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याने पाहायला मिळतंय. शिवसेनेने कामराने चित्रीकरण केलेल्या स्टुडिओची तोडफोड केल्याचं देखील पाहायला मिळाल. त्यामुळे आता आणखी याचे काय पडसाद उमटताय हे पाहणं महत्वाचं ठरणारे. कोण आहे कुणाल कामरा पाहुयात: 

कोण आहे कुणाल कामरा? 

कुणाल कामरा प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सोशल मीडियावर कुणाल कामराचे लाखो फॉलोअर्स. तिखट आणि बिनधास्त राजकीय व्यंग्यासाठी ओळखला जातो. अनेकदा सरकार, राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींवर कॉमेडीच्या माध्यमातून टीका . 2020 मध्ये कुणालनं सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांवर टीका करणारे ट्विट्स केले होते. कुणाल विरुद्ध अवमानाचा खटला दाखल झाला होता. 28 जानेवारी 2020ला पत्रकार अर्णब गोस्वामींसोबत इंडिगोच्या विमानात वाद. वादानंतर कुणालवर काही विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली. कामराने मतांवर ठाम राहण्याची भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. 1 मार्च 2017 ला युट्यूबर "देशभक्ती आणि सरकार" नावाचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओतून नोटबंदीवरुन सरकारची खिल्ली उडवल्याचा आरोप. विश्व हिंदू परिषदेनं अनेकदा कुणालचे शो बंद पाडले होते. कॉमेडीतून टीका केल्यानं कुणाललाअनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या. एक न घाबरणारा आणि बंडखोर कॉमेडियन म्हणून कुणालची प्रतिमा

हेही वाचा:  राजकारणात नवा ट्विस्ट! आता व्यंगात्मक गाण्यातून वार पलटवार

आत्तापर्यंत कोणते कॉमेडियन वादात?

रणवीर अलाहाबादिया 
इंडिया गॉट लेलंट शोमध्ये आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानं मोठा गदारोळ 

तन्मय भट्ट  
'एआयबी' रोस्टमुळे अनेकदा वादात 
लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरची खिल्ली उडवल्यानं वाद

मुनव्वर फारुखी
2021 मध्ये इंदूरमध्ये हिंदू देवता आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्यानं अटक 

रोहन जोशी 
मोजोरोजो नावानं ओळखला जातो 
अश्लील विनोदांमुळे अनेकदा अडचणीत 

विदुषी स्वरूप
वेश्या व्यवसायाविषयी भाष्य केल्यानं तीव्र टीका

अबिश मॅथ्यू 
एआयबी रोस्टमध्ये ख्रिश्चन समाजाविषयी अश्लील विनोद 
चर्चची माफी मागण्याची वेळ 

काय आहे वादाची कारणे : 
विदुषी स्वरूप
स्टँडअप कॉमेडियन विदुषी स्वरूप यांनी आपल्या शोमध्ये वेश्या व्यवसायाविषयी काही बोलले होते, ज्यामुळे त्यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. सोशल मीडियावर लोकांनी त्याचे जोक्स हास्यास्पद म्हणत त्याला खूप ट्रोल केले. विदुषी आजही कॉमेडी करते. पण त्यांच्याकडे पूर्वीच्या तुलनेत फारच कमी शो आहेत.

अबिश मॅथ्यू
ज्या ‘एआयबी रोस्ट’वर टीका झाली त्यात अबिश मॅथ्यूचा समावेश होता. या शोमध्ये अबीशने ख्रिश्चन समाजाविषयी अश्लिल विनोद केला आणि यामुळे त्याला चर्चची माफी मागावी लागली. एआयबीपासून विभक्त झाल्यानंतर अबिशने स्वत:चा चॅट शो सुरू केला. पण आता सोशल मीडियाऐवजी अबिश ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काम करण्यास प्राधान्य देतो.

मुनव्वर फारुकी
मुनव्वर फारुकी ला 2021 मध्ये इंदूरमध्ये हिंदू देवता आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आजही अनेक ठिकाणी मुनव्वरचे शो रद्द केले जातात. पण एकता कपूरने त्याच्या कारकिर्दीतील बुडत्या बोटीला आधार दिला आणि त्याला त्याच्या रिअ‍ॅलिटी शो ‘लॉक अप’ साठी कास्ट केले. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वरला करिअरमध्ये दुसरी संधी मिळाली.


 


सम्बन्धित सामग्री