महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. आधिच महाराष्ट्रात नेतेमंडळी एकमेकांवर वार पलटवार करतांना पाहायला मिळतात. त्यातच आता राजकारणात नवा ट्विस्ट आला असून व्यंगात्मक गाण्यातून एकमेकांवर वार पलटवार केले जाताय. कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं गायलंय आणि यातूनच राजकारणात एक नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचं म्हणत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याने पाहायला मिळतंय. शिवसेनेने कामराने चित्रीकरण केलेल्या स्टुडिओची तोडफोड केल्याचं देखील पाहायला मिळतंय.
हेही वाचा: World TB Day: जनजागृती आणि प्रतिबंधासाठी महत्त्वाचे पाऊल
यात आता नवा ट्विस्ट म्हणजे शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये व्यंगात्मक गाण्यातून वार पलटवार सुरु असल्याचं समोर आलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी देखील कुणाल कामरा आणि ठाकरे गटाला गाण्यातून प्रत्युत्तर दिले. या गाण्यातून शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. तर, एकनाथ शिंदे यांच्याकडे जनतेच्या नजरेने पाहिले की तुम्हाला वाघ दिसून येईल असेही ज्योती वाघमारे यांनी सांगितले.
त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेले गाणे पुन्हा गात शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कामराचा स्टुडिओ फोडला..! आता आपटे, सोलापूरकर , कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची..? असा सवाल करत ठाकरे गटाच्या नेत्या सुधाम अंधारे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. त्यामुळे आता व्यंगात्मक गाण्यातून वार पलटवार प्रकरण नक्की काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.