जनतेने एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले
नाशिक : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाशिकमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट केले. त्या शिवसेना महिला आघाडीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आल्या असून, गोदावरी आरतीत सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, "गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी जीवन वाहिनी आहे. ती आमच्याशी कायम जोडून राहावी अशी मी प्रार्थना करणार आहे."
नीलम गोऱ्हे यांनी राज्यघटनेवर विश्वास असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "आपण सर्व राज्यघटना मानणारे लोक आहोत. काही निराधार गोष्टींची चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नये."
👉👉 हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची चाकूने भोसकून हत्या
एकनाथ शिंदे यांची नाराज नाही
"एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी नाही. कालच ते माझ्या घरी पुण्यात जेवायला आले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही," असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेणार
नीलम गोऱ्हे यांनी पालकमंत्री पदाबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार विचार करतील."
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अंबरनाथ महिला हत्येवर भाष्य
"अशा घटनांवर कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. येत्या ६ जुलै रोजी मुंबईत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे," असे त्या म्हणाल्या.
संजय राऊत यांना टोला
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत गोऱ्हे म्हणाल्या, "एकेकाळी आमचे सहकारी असलेले काही नेते भरकटले आहेत. जनतेने जनधार देऊन एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे."