Sunday, April 20, 2025 05:12:38 AM

खासदार सुप्रिया सुळेंनी कुणावर साधला निशाणा?

सद्या सर्वत्र चर्चा आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची. 100 दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे. सहा महिने आणखी थांबा आणखी एक विकेट पडेल.

खासदार सुप्रिया सुळेंनी कुणावर साधला निशाणा

महाराष्ट्र: सद्या सर्वत्र चर्चा आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याची. 100 दिवसांमध्ये महायुतीमधील एका मंत्र्याची विकेट गेली आहे. सहा महिने आणखी थांबा आणखी एक विकेट पडेल, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेय. त्यांच्या या वक्तव्याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा असून खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमका कोणावर निशाणा साधलाय असा प्रश्न सर्वानाच पडलाय. त्याचबरोबर राज्यातील एक मंत्री खूप बोलत आहेत. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केलीय .

‘बरे झाले पक्ष फुटला. जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही,‘‘ अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना ‘ शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे,’ असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

हेही वाचा: हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर पुरातत्व विभाग कामाला

खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते पाहूयात: 
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
कधीतरी एकदा बीडला जा
संतोष देशमुख,महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना भेटा 
महादेव मुंडेंची बायको विचारते, माझ्या लेकरांची चूक काय ?
मी संतोष देशमुखांच्या आईला, बायकोला भेटले 
संतोष देशमुखांच्या आईनं विचारलं सुप्रिया तू न्याय देण्याचा शब्द देशील का?
मी त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला
मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला..
ते जर या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी
माझी लढाई ते पक्षात असतानाही त्यांच्यासोबत होती हे सगळ्यांना माहिती
जो पुरुष आपल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो 
तो पुरुषच नाही..आणि मी त्याच्यासोबत काम करणार नाही


 


सम्बन्धित सामग्री