Friday, March 21, 2025 09:37:31 AM

रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय

फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय बनलाय.

रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय

महाराष्ट्र: फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय बनलाय. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज ठेवलेल्या मोबाईल स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे. "सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार" अशा आशयाचा हा स्टेटस असून यामधून त्यांनी माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचा पाहायला मिळतंय. 

हेही वाचा:  मनसेचा कोणता नेता जाणार भाजपा विधान परिषदेवर?

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा पडला. या छापेमारी काही निष्पन्न झाले नाही, असा दावा संजीवराजे निंबाळकर यांनी केला.

काय म्हणाले संजीवराजे निंबाळकर? 

आयकर विभागाच्या पाच दिवसांच्या छाप्यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत फक्त दोन लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. ती रक्कम देखील आयकर विभागाने परत केल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा:  राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने पाच दिवस छापा टाकला होता. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा पडला. या छापेमारी काही निष्पन्न झाले नाही, असा दावा संजीवराजे निंबाळकर यांनी केला.

दरम्यान आता रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय ठरतं असून 'सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार' असं म्हणत माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकरांवर रामराजेंनी निशाणा साधलाय का असा प्रश्न सर्वानाच पडलाय. 

सम्बन्धित सामग्री