बीड: सद्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. खोक्याचा पैशांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो आणखीनच चर्चेत आला. बीडच्या शिरूरमध्ये मारहाण प्रकरणात फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. खोक्या याच्या अटकेनंतर 13 मार्च रोजी खोक्याच्या व्हाईट हाऊसवर बुलडोझर देखील फिरवण्यात आला. खोक्याने वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर बांधले होते. वन विभागाने धडक कारवाई करत त्याचे घर जमिनदोस्त केले. यानंतर भाजप आमदार सुरेश धस हे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी दाखल झाले आहेत. खोक्या हा सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे.
हेही वाचा: मुंबईकरांची स्वप्नपूर्ती होणार! 12 लाखांत पूर्ण होणार घराचं स्वप्न
कोण आहे खोक्या भोसले?
सतीश भोसले उर्भ खोक्या भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. तो भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा प्रमुख आहे. सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर पारधी समाजासाठी काम केल्यानंतर सतीश भोसले याची ओळख निर्माण झाली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याची या परिसरात दहशत आहे. त्याने हरिणांची आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मांस सापडल्याची माहिती समोर आल्याने देखील एकच खळबळ उडाली होती.
त्यातच आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. खोक्याचा पैशांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो आणखीनच चर्चेत आला. बीडच्या शिरूरमध्ये मारहाण प्रकरणात फरार असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. खोक्या याच्या अटकेनंतर 13 मार्च रोजी खोक्याच्या व्हाईट हाऊसवर बुलडोझर देखील फिरवण्यात आला. या कारवाईनंतर आमदार सुरेश धस हे खोक्याचे घरी दाखल झालेत.