महाराष्ट्रात पहिल्यांदाच सोशल वॉर रूम स्थापन केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ही महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहेत. या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.या संदर्भात आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
थेट जनतेशी निगडीत योजनांवर लक्ष
• या सोशल वॉर रूमद्वारे सरकारच्या महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांचे मॉनिटरिंग केले जाईल.
• जनतेशी थेट संबंधित योजनांचा प्रगती अहवाल घेण्यात येईल.
• सरकारच्या उपक्रमांबद्दल त्वरित माहिती संकलन व अंमलबजावणीला गती दिली जाणार.
हेही वाचा: मुंबईच्या लोकलसेवेला आज १०० वर्ष पुर्ण
राज्यात आता दोन वॉर रूम
• यापूर्वीच्या वॉर रूममध्ये राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता.
• आता नव्याने स्थापन होणारी सोशल वॉर रूम समाजकल्याण योजनांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
• दोन्ही वॉर रूम एकत्र काम करून राज्याच्या विकास प्रक्रियेला नवा वेग देणार आहेत.
हेही वाचा: Maha Kumbh's third 'Amrit Snan' कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान , कोट्यवधी भाविक स्नान करणार!
सोशल वॉर रूममुळे काय होणार?
• योजनांची अंमलबजावणी जलदगतीने होईल
• जनतेपर्यंत योजनांची माहिती अचूक पोहोचेल
• सरकारी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल
• प्रकल्प आणि योजनांवर त्वरित कृती केली जाईल
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.