Sunday, August 17, 2025 04:06:45 PM

खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा खास कार्यकर्ता असून त्याचे गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेत.

खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाचं आंदोलन

तुळजापूर: गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगलाच चर्चेत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा खास कार्यकर्ता असून त्याचे गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ देखील समोर आलेत. त्यातच आता या खोक्या समर्थनार्थ तुळजापुरात आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाने हे आंदोलन केलंय. दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या याला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचं या पारधी समाजाचं म्हणणं असून आता नेमकं हे आंदोलन काय वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 

हेही वाचा: Mumbai: तीव्र उन्हळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

तुळजापूर-सोलापूर महामार्ग, तुळजापूर-धाराशिव महामार्ग आणि इतर प्रमुख मार्ग अडवून समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. मागील एका तासापासून हे आंदोलन सुरू असून, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सतीश भोसले याला जाणिवपूर्वक अडकण्यात येत असल्याचा आरोप या पारधी समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजपा आमदार सतीश भोसले यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. त्याचे गुंडागिरी करतांनाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन प्रयराजमधून त्याला अटक केली. त्यानंतर आता खोक्या समर्थनार्थ तुळजापुरात आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. खोक्याच्या समर्थनार्थ पारधी समाजाने हे आंदोलन केलंय. दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्या याला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचं या पारधी समाजाचं म्हणणं असून आता नेमकं हे आंदोलन काय वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री